आज घरी सुंदर बाळ आले छान ।
सर्वांच्या आनंदाला तर उरले नाही भान ।।1।।
आई बाबा झाले आता तुमचे अभिनंदन ।
देवाने दिली हि गोड भेट त्याला करा वंदन ।।2।।
आजी आजोबा तर खुश झाले असतीलच नाही काय ।
कारण त्यांना नेहमीच आवडते म्हणतात दुधावरची साय ।।3।।
ताई ,आत्या ,मामा ,मावशी नवीन नात्याचा जमेल आता मेळा ।
तू नेहमी आनंदी ,सुखी ,दीर्घयुषी राहा तान्ह्या बाळा ।।4।।
लवकर तुला कुशीत घ्यायला मी वाट बघते आहे तुझी ।
सर्वांपेक्षा छान गट्टी जमवायला आहे ना तू राजी ।।5।।ताई तुझ्यासोबत खेळायला उत्सुक आहे फार ।
तुला भेटायला येताना विचारते आणू का छोटीशी कार।।6।।
Comments

Thank you Aatya... Khup chan... Miss u all... 👶
ReplyDeleteMiss u too ..
Delete