लेक आणि बाबा



एक होती लेक छोटीशी जरा  ।
घरात चाले नेहमीच तिचाच तोरा ।।1।।
तिचे बाबा गेले होते परगावाला ।
फोनवर म्हणायची बाबा आठवण येते मला ।।2।।
आईची आणि तीची गट्टी जमायची छान ।
पण बाबाचा तिला होता मोठा मान ।।3।।
आज येणार म्हणून केली छोटीशी कविता ।
तुझ्या वेलीवरची राहील मी लता ।।4।।
बाबा मी तुम्हाला मिस केले खूप ।
आज आता आल्यावर लावू नका तूप ।।5।।

Comments

Post a Comment