मन हलके करताना कंठ येतो दाटून ।
कधी कधी तर डोळ्यातील अक्षू हि जातात आटून ।।1।।
मन असावे नेहमी म्हणतात सुंदर आणि आनंदी ।
पण का हो आनंदाचा क्षण घालवताना येते पाबंदी ।।2।।
कळत नाही कधी कस समजावं या मनाला ।
ज्याच्या आनंदासाठी मी सगळंच लावून बसली पणाला ।।3।।
आनंदाच्या क्षणापेक्षा दुःखाची आठवणी काढता का हो
हे मन ।
आता ठरवले प्रत्येक अनुभवातून कणखर होता आले पाहिजे पण ।।4।।
सर्व कळत पण वळत नाही हे असं ।
पुढ्यात वाढलेल्या सुखात दुःखाचा विचार करते मन जसं ।।5।।
Comments
Post a Comment