नवीन वर्षांत आज आगमन करतोय आपण सर्व ।
टेकनॉलजी च्या विश्वात जगण्याचा बाळगा तुम्ही गर्व ।।1।।
व्हाट्सअप वरूनच आता दिल्या जातात शुभेच्छा ।
नवीन वर्षात आता पूर्ण होवोे तुमच्या इच्छा ।।2।।
फेसबुक ,इंस्टाग्राम वर फोटो टाकून आपला ।
लाइक ,कंमेन्ट ची वाट बघत दिवस पुरा संपला ।।3।।
आहारी न जाता टेकनॉलजीच्या लक्ष्यात ठेवा काही ।
आपल्या साठी काय चांगले मनाला सतत विचारत राही ।।4।।
बाहेर पढून या मधून निसर्गाच्या सानिध्यात जाऊ ।
एकमेकांशी हितगुज करून गीत नवे गाऊ ।।5।।
कडे कपारी चढताना इतिहास आपुला जानुया ।
मनात मुलांच्या शौर्य, बलिदानचे महत्त्व गिरवुया ।।6।।
बाहेर पडून सर्वांनी भौगोलिक रचना जाणून घ्या ।
सुष्टिच्या संवर्धनासाठी सर्व मिळून एकत्र या ।।7।।
झाडे लावा झाडे जगवा मंत्र नवा जोपासा ।
पर्यावरण स्वच्छ ठेवायचा नवीन वर्षांत घेऊन वसा ।।8।।
Comments
Post a Comment