वर्षातला आज हा दिवस आहे खास ।
या सुंदर दिवसाचा नेहमी दरवळत राहील सुवास ।।1।।
आज आपल्या भेटीला पूर्ण झाले दशक ।
साथ एकमेकांची देऊन करणार कारे आपणं
शतक ।।2।।
मित्र ,सखा बनून तू नेहमीच करतो मला मार्गदर्शन ।
त्यामुळेच तर तुझ्या स्वभावाचे आहे मला आकर्षण ।।3।।
साथ अशीच देत रहा मला त्या प्रत्येक क्षणी ।
जो अनुभवताना मी राहील तुझी ऋणी ।। 4 ।।
तिखट - गोड आठवणीत आज वर्ष झाली दहा ।
पुरे झाले कौतुक माझ्या गिफ्टच आता जरा पहा ।।5।।
Comments
Post a Comment