स्त्री तुझी सांगते आज कहाणी ।
धावपळीच्या या जगात हो तू शहाणी ।।1।।
मुलगी,बहीण,पत्नी,सून,आई ,मैत्रीण किती तुझी नाती ।
जळते सतत घरासाठी जशी ही दिव्यातली वाती ।।2।।
साधी सरळ असते तू तुझ्या सुखी आयुष्यात ।
संकट येता दुर्गा होऊ शकतेस तू भविष्यात ।।3।।
सर्व चिंता ,निराशा यांच्यावर कर मात ।
सरून जाते नेहमीच काळजीची ती रात ।।4।।
हसेल चांदणी आणि निरभ्र होऊन जाईल आकाश ।
श्वास घे मोकळा सर्व चिंतेचे तोडून पाश ।।5।।

Comments
Post a Comment