मी

मी हा शब्द सुचवितो काही ।
तो जपण्यासाठी मनात डोकावून पाही ।।1।।
चालत नाही प्रत्येक ठिकाणी मी पणा करून ।
आयुष्यात घ्यावा कधी कमीपणा मागे सरून ।।2।।
कमीपणा घेऊन होत नाही कोणी छोटा ।
मनातलं भाव असावा लागतो त्यासाठी मोठा ।।3।।
लोक भेटतात आपल्याला किती तरी स्वभावाचे ।
पण स्वभावाला औषध नसत कोणत्याही उपायाचे ।।4।।
म्हणूनच वेळ बघून मी पणा घ्यावा कधी नमता ।
परंतु व्यक्तीत असावी त्यासाठी तेवढी क्षमता ।।5।।

Comments