गणपती बाप्पा मोरया

आले गणराया नाचत सर्व झाले दंग ।
तुझ्या येण्याने आणले सगळ्यांना इथे संग ।।1।।
आम्ही सर्व तुझ्या येण्याची बघतो वर्षभर वाट ।
तुझ्या पर्यंत इथे यायला गर्दी होते दाट ।।2।।
पाच दिवस असतो तू उत्साह असतो भरून ।
वर्षभर तो असाच राहावा न जावा कधी सरून ।।3।।
एकत्र येण्याने प्रत्येकातील कला होते इथे सादर ।
त्यातूनच एकमेकांबद्दल वाढतो मग आदर ।।4।।
लहान मुलांना कौतुकाची हवी असते एक थाप ।
त्यांच्यातील हुशारीचे आणि चांगुलपणाचे वाढू दे तू माप ।।5।।
शपथ घेऊ समाजाच्या प्रगतीसाठी करू काही छान ।
त्यासाठी तुझ्या आशीर्वादाचे दे आम्हा सर्वांना तू दान ।।5।।



Comments

Post a Comment