जगात सगळयांचे वेगळे असतात स्वभाव ।
सर्वांच्या समोर राव आणतात चांगुलपणाचा आव ।।1।।
दुसऱ्याची चूक दिसते कशी पटकन ।
आपल्या चुकांचे भांडार झाकून ठेवतात चटकन ।।2।।
कितीही चांगला तरी नाही कौतुकाची कधी थाप ।
काम तसंच आहे त्याच म्हणून भरले जाते मापं ।।3।।
करा कधी विचार आपल्या कौतुकाने होईल आनंद कुणाला ।
आनंदाने आयुष्यात सर्वस्व लावेल हो पणाला ।।4।।
जीवन आहे खूप खूप सुंदर आनंदाने जगा ।
दृष्टिकोन बदलवून त्याकडे सकारात्मक बघा ।।5।।
स्वतःला करून नका घेऊ जास्त त्रास ।
आपल्याच तब्येतीचा होतो यात ऱ्हास ।।6।।
बोलणार बोलताना कधी करत नाही विचार ।
त्या बोलण्याचा विचारात मात्र आपण होतो लाचार ।।7।।
देवाने पाठवले म्हणतात आपल्याला मोजून श्वास ।
आयुष्य सुखी , समाधानी जगण्याचा घेऊ ध्यास ।।8।।

Comments
Post a Comment