आज हा सुंदर योग जुळून आला कसा ।
रथसप्तमीला सूर्यनमस्कार घालायचा घेतला आम्ही वसा ।।1।।
नशीबवान आहोत आम्ही सर्व लाभले गुरू छान ।
योगाभ्यासाने शरीर आणि मनातला निघून जातो ताण ।।2।।
शरीर आणि मन दोघांचे आहे अतूट नाते ।
भावनांवर नियंत्रण येऊन मन आनंदाने गाते ।।3।।
कपालभाती,अनुलोम विलोम प्राणायामाचे आहेत प्रकार ।
आयुष्याला पूर्णत्व देऊन जातो ओंकारातला मकार ।।4।।
योगाभ्यासाने आयुष्य आनंदाने जगण्याचा दिला आम्हाला मंत्र ।
व्यायाम न केल्याने होऊन जाईल शरीराचे यंत्र ।।5।।
रोज योगाभ्यास करून स्वतः राहू आता फिट ।
हा वेळ माझा आहे हे सर्वांनी लक्ष्यात ठेवा नीट ।।6।।

Comments
Post a Comment