देशप्रेम

जागृत झाले देशावर सर्वांचे प्रेम ।
ते कायम किती दिवस राहील याचा नाही नेम ।।1।।
का उफाळून निघतो देश काही तरी घडल्यावर ।
सर्वाना जाग येते वीर धारातीर्थी पडल्यावर ।।2।।
शहीद झालेल्या जवानांची काहीच नव्हती चूक ।
पण हे घडवून आणणारे शिक्षा भोगतील खूप ।।3।।
आयुष्याचा डाव सोडून गेलेत ते अर्ध्यावर ।
देशासाठीचे खरे प्रेम कोरून गेले मनावर।।4।।
या प्रसंगातून खूप परिवारांनी कुणीतरी  गमावलं ।
आता ते परत भेटणार नाही हे मनाला समजावलं ।।5।।
हे असे परत घडू नये याकडे द्या आता लक्ष ।
चूक एकमेकांची दाखवण्यात का भांडताय पक्ष ।।6।।

Comments

  1. युद्ध नको शांतता हवी आहे.

    ReplyDelete

Post a Comment