जागतिक महिला दिवस

आज आपण साजरा करतोय महिला  दिवस ।
तू  सतत तेवत राहणाऱ्या तुझ्यातल्या स्वतः ला गवस ।।1।।
का म्हणून दिवस साजरा करायची आली  वेळ  ।
कारण समाजानी मांडून ठेवला स्त्रीत्वाचा खेळ ।।2।।
एक मुलगी,बहीण ,आई,पत्नी बजावते जन्मभर अश्या खूप भूमिका ।
घर , नोकरी करताना थोडे कुठे कमीजास्त झाले तर करू नका टीका ।।3।।
मुली घरात असल्या कि घराला असते घरपण ।
तिला खुश करायला आपण जपाव तिचं मन ।।4।।
खुश असतो वास्तुपुरुष ज्या घरात स्त्री असते आनंदी ।
तीही दुप्पट देते सर्वाना द्या तिला एकदा संधी ।।5।।






Comments

  1. खरे आहे एक स्त्री ज्या भूमिका बजावते त्या कुणाला जमणार नाहीत हे नक्की.
    खूप छान संदेश

    ReplyDelete
  2. खूपच प्रेरणादायी अभिप्राय धन्यवाद सर .

    ReplyDelete

Post a Comment