माझी एक छोटीशी तक्रार स्वतःशी ।
माझ्यासाठी खुश होईल का नाही संगत लाभली अशी ।।1।।
खूप मन दुखत कधी आतल्या आत ।
आपण किती खुश असतो सर्वांच्या सुखात ।।2।।
अस म्हणतात मित्र नापास झाला तर होत दुःख ।
पण तोच जवळचा मित्र पहिला आला तर पाहण्यासारखं असत मुख ।।3।।
समाजाची विचार करण्याची पद्धत कळतच नाही ।
दुसऱ्यांच्या प्रगतीत स्वतःची हार होते मानत राही।।4।।
देवा कडे मागतेे एकच आज मागणे ।
विचारात येऊ दे सकारात्मकतेचे वागणे ।।5।।
Comments

गोड तक्रार
ReplyDeleteधन्यवाद सर😊
ReplyDelete