एक सुंदर नात


मुली आणि बाबाच एक सुंदर असं नातं ।
आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर नव गाणं गात ।।1।।
मन असत आनंदी जेव्हा तो घेतो तिला कुशीत ।
आकाश होते ठेंगणे कारण तो असतो खुशीत ।।2।।
कौतुक तिचे करताना थकत नाही तो कधीच ।
तिच्या साठी त्याच महत्व कळलं असत त्याला आधीच ।।3।।
ती असते घराच घरपण तर तो असतो कणा ।
त्याच्याशिवाय तिच्या आयुष्यातला कोपरा असतो उणा ।।4।।
ती मोठी होताना तो बघत असतो जरा दुरून ।
सासरी घेल्यावर ती घरात आठवणी जातात उरून ।।5।।
नेहमी राहा आनंदी देतो आशीर्वाद मनातून ।
काळजी घेतो याची आसु दिसू नये डोळयातून ।।6 ।।
तो असतो नेहमी सुपर हिरो तिचा तर ती त्याची परी ।
असच हे नातं सुदंर बहरून यावं प्रत्येकाच्या घरी ।।7।।

तुम्ही आयुष्य जगण्याचा दिलेला सल्ला नेहमीच असतो योग्य ।

मी तुमची मुलगी आहे  हे माझं सर्वात मोठं भाग्य ।।8।।

नेहमी रहा निरोगी व आनंदी हीच माझी मनापासून इच्छा ।

आज या फादर्स डे च्या तुम्हाला खूप  खूप  शुभेच्छा ।। 9।।

Comments