डबा (शिदोरी )


फार पूर्वी पासून चालत आली हि प्रथा सोबत डबा दयायची ।
त्यात नेहमीच प्रेमाची ,आपुलकेची ,मायेची ऊब असायची ।।1।।
शेतावर जाताना जमायची चटणी नि भाकरीची  गट्टी ।
जेवताना कांदा,लिंबू नि ठेचा यांची असायची बट्टी ।।2।।
प्रवासाला जाताना सोबत घ्यावे म्हणतात लाडू तहान नि भूक ।
घरचं ते घरचच असते खाताना लाभते सुख ।।3।।
नोकरी वर जाताना घरच्या डब्याची असावी नेहमीच साथ ।
बाहेरच खाण्याऱ्याला माहीत असत घरी बनवलेल्या अन्नाची औरच असते बात ।।4।।
आईच्या मायेची असते ऊब ,बहिणीची सावली तर बायकोच असते प्रेम ।
कधी कधी डबा उघडताच दिसते भाजी सहकाऱ्यांची सेम।।5।।
लहान मुलांच्या डब्यात  फार जपाव्या लागतात आवडी  आजकाल देताना ।
आमच्या वेळेस असे नव्हते संपल नसेल तर भीती वाटायची घरी येताना ।।6।।
डबा बनवताना सकाळी उठून पडतात थोडे कष्ट ।
पण आपल्या माणसासाठी बनवताना त्यात आनंद दिसतो स्पष्ट ।।7।।
छान छान भाजी,डाळ नि असावी कोशिंबीर सोबतीला ।
आजकाल तर अनेक रेसिपी चॅनल्स पण आहे आपल्या मदतीला ।।8।।
असा या डब्याचा वर्षानुवर्ष बदलत गेला प्रकार ।
भाव असतो महत्वाचा मग त्याचा कसा हि असो आकार ।।9।।









Comments

Post a Comment