आली जवळ निवडणूक चला करूया मतदान।
सुशिक्षित ,प्रामाणिक उमेदवाराला देऊ आता मान ।।1।।
मतदान म्हणजे सुट्टी हा विचार आता सोडा ।
देशाच्या उन्नतीसाठी आपलं नाव यादीत जोडा ।।2।।
मतदान करून आपण पूर्ण करू आपली जबाबदारी ।
तुमचं एक मत पण दूर करेल राजकारणातील मक्तेदारी ।।3।।
संविधानाने दिला आहे आपल्याला हा मूलभूत अधिकार ।
तो बजावण्यासाठी सक्षम व्हा नका घेऊ आता माघार ।।4।।
जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधी च्या माध्यमातून चालते राज्य ।
निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदानाला होऊ आपण सज्ज ।।5।।

Comments
Post a Comment