आज सर्वत्र जागवली जाते कोजागिरीची रात्र ।
चंद्राची शीतलता नि दुधाचा गोडवा शरीरातील उष्णता कमी करण्यास आहे पात्र ।।1।।
पूर्वजांनी जोडून ठेवलं आपलं निसर्गाशी नातं ।
चंद्राच्या मंद प्रकाशात मन आनंदी होऊन गातं ।।2।।
आटवताना दूध गप्पा , गोष्टीत जागवली जाते रात ।
गोड गोड दुधा सोबत आपल्या माणसाची साथ ।।3।।
कोजागीरीची आहेत नावे अश्विन ,शरद,कौमुदी आणि माडी ।
औषधी युक्त बनवण्यासाठी चंद्राचे प्रतिबिंब दुधात पाडी ।।4।।
जीवेत शरद शतम् म्हणून वाढदिवसाला दिल्या जातात शुभेच्छा ।
त्यात शंभर शरद ऋतू अनुभवण्याचे भाग्य लाभो हि असते सदिच्छा ।।5।।
आजच्या दिवशी करतात भुलाबाईची सजावट ।
भुलाबाईची गाणी मुली घरोघरी जाऊन म्हणतात पटापट ।।6।।
भुलाबाई उत्सव आहे वैदर्भीय लोकसंस्कृतीचा ठेवा ।
गाणे संपल्यावर खिरापत ओळखताना असतो त्यात मेवा ।।7।।
भुलबाईच्या गाण्यात सासर नि माहेर चा उल्लेख आहे फारसा ।
अश्या या आपल्या संस्कृतीचा जपावा आपण वारसा ।।8।।
चंद्राच्या सानिध्यात चांदणी शोभून दिसते लाजरी ।
चला करूया एकत्र येऊन आनंदाने पौर्णिमा साजरी ।।9।।
Comments

Very nice bhumika
ReplyDeleteThank you😊
Delete