आर्थिक मंदी


भारतावर घिरट्या घालतय आर्थिक मंदी चे सावट ।

आकडेवारी नुसार विकासदरात झाली आहे मोठी घट ।।1।।

आज जी भेडसावते आहे देशात मंदी ।

खरचं ठरली का कारणीभूत याला जिसटि नि नोट बंदी ।।2।।

आर्थिक मंदी म्हणजे नेमकं काय ?।

विषमतेची प्रचंड वाढलेली दरी दुसरं काय ।।3।।

श्रीमंत झाला जेवढा ऊचा तेवढाच गरीब झाला खुजा । 

वाढती महागाई ,बेरोजगारी यांची सामन्य जनतेला मिळते सजा ।।4।।

उत्पादनात प्रचंड वाढ पण त्याची विक्री झाली नाय ।   नोकरवर्ग कमी करण्याचा त्यावर शोधला जातोय मग  उपाय ।।5।।

कंपनीचा वाढता तोटा ,फुगणारी बेरोजगारी ठरतंय मोठं संकट ।

सरकारनी यावर मात करण्यासाठी उपाययोजना अंमलात आणावी बळकट ।।6।।

तरुणांना रोजगार ,शेतकऱ्यांना  हमीभाव अशी नुसती आश्वासन आता करून चालणार नाही।

देशाची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे प्रतिज्ञा केल्याचे आठवणीत राही ।।7।।

खूप काबाड कष्ट करून शेतकरी पिकवतो मातीतून मोती ।

त्याच्या पिकाला भाव द्यावा न सडावी  बाजारपेठेत धान्याची पोती ।। 8।। 

नुसतं सरकार ला दोष देऊन मोकळं होऊ नका  ।

भ्रष्टाचार ,अंधश्रद्धा  यांसारख्यातुन स्वतः जपा ।।9।।

छोटा व्यापारी , शेतकरी  यांचे कडून खरेदी करतांना करतात मोलभाव ।

मॉल मध्ये खरेदी करताना आणतात मोठेपणाचा आव ।।9।।

विदेशी मालापेक्षा स्वदेशी ची  देऊन साथ ।

आपण सर्वांनी करूया आलेल्या संकटावर मात।।10।।

Comments

  1. Very nice..masst.. Thanks for taking this subject.

    ReplyDelete

Post a Comment