माझ्या अमरावती मध्ये आहे काही तरी खास ।
येथील प्रत्येका मध्ये आपुलकीचा दरवळतो सुवास।।1।।
अमरावतीचे दैवत अंबा आणि एकवीरा आई ।
नवरात्रीत सर्व वातावरण भक्तिमय होऊन जाई ।।2।।
विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून आहे अमरावतीची प्रसिद्धी ।
येथे आहे मेळघाट, सालबर्डी, अप्पर वर्धा नि जागृत अष्टमासिद्धी ।।3।।
स्वछता, शिक्षण यांचे महत्व सांगणारे लाभले गाडगे महाराज ।
देव आहे माणसात सांगून गेले ज्याची गरज आहे खरचं आज ।।4।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरुकुंज आश्रम मोझरी ।
ग्रामगीता व खंजिरी भजनातून प्रबोधनात्मक विचारसरणी पाझरी ।।5।।
डॉ.पंजाबराव देशमुख यांचे शिक्षण क्षेत्रांत अमुल्य असं योगदान ।
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा तर सगळीकडेच मोठा आहे मान ।।6।।
छत्री तलाव, वडाळी तलाव आणि आपली मालटेकडी ।
चिखलदऱ्याला जाताना वाट आहे जरा वाकडी ।।7।।
प्रसिद्ध आहे बहिरमची यात्रा नि रघुवीरची सांभारवडी ।
कुरडया, पापड, धापोडे सोबतच आठवते तळलेली खारवडी।।8।।
खरेदी करताना गौदुग्ध सागराची लस्सी करते थकवा दूर ।
सर्व काही लिहिताना आला आज आठवणींचा पूर ।।9।।
जोशी मार्केट, जवाहर गेट इथे तर खरेदीची मजाच न्यारी ।
म्हणून तर म्हणते माझी अमरावती आहे लय भारी ।।10।।
Comments

1 no.. Jabardast
ReplyDeleteThank you 😊👍
DeleteNice composition
ReplyDeleteThank you😊
DeleteNice composition
ReplyDeleteThank you😊
Delete