सगळयांच्या आई सारखीच आहे माझी आई ।
पण प्रत्येक काम लवकर नीटनेटकं करायची तिची असते घाई ।।1।।
काम चुकारपणा तिला कधी खपतच नाही ।
चांगल्या गोष्टी नेहमी शिकायला ती तयारच राही ।।2।।
शिक्षणा बरोबर तिने दिले आम्हाला संस्काराचे धडे ।
माणुसकीने,आपुलकीने वागल्याने चांगला माणूस घडे।।3।।
कुणाची काकू ,मामी,आत्या ,मावशी तर कुणाची नानी,आजी ।
सर्वाचे मन सांभाळायाला असते नेहमीच ती राजी ।।4।।
जपते सगळी नाती आनंदाने आयुष्यभर ।
प्रत्येकाचा विचार करताना सांभाळतें आपलं घर ।।5।।
तुला लाभला सखा साजेसा, जोडी आहे छान ।
असेच राहा आनंदी देवाकडे एवढेच मागते मी दान ।।6।।
नेहमी खूश रहा जुन्या आठवणीत नको होऊ कष्टी ।
भरभरून आनंद आहे चोहीकडे फिरवं आपली दृष्टी ।।7।।
खूप काही आहे लिहायचे पण अपुरे पडतात शब्द ।
वाटत तुझ्या कुशीत राहावं पडून स्तब्द ।।8।।
नेहमी अशीच आनंदी ,निरोगी राहा हि माझी सदिच्छा ।
तुला आज तुझ्या वाढदिसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।9।।

Khup chan
ReplyDeleteThank you😊
Delete