पूजा करून उठताना नव्हती मी सजग ।
घाई घाईत नेमकी पायला बसली लचक ।।1।।
तेव्हा वाटलं हे तर थोडंस दुखणं बसून जाईल पाय ।
हळूहळू त्यात वेदना होऊ लागल्या हाय ।।2।।
दवाखाण्यात जाण्याशिवाय आता काही पर्याय नाही ।
प्लास्टर लागलं पायाला नेहमीसाठी आठवणीत राही ।।3।।
आता वजन वाढणार मिळाला सल्ला बसून बसून ।
मनात चर्र झाला त्याला उपाय नाही सामोरं जावं लागेल हसून ।।4।।
काही तरी चुकीचं वागण्याचं देवाने दिले आहे हे फळ ।
असं काही ऐकून मनात साठवलेल खचल सार बळ ।।5।।
B12 ,D3 च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ झाल्याचे म्हटले डॉक्टर ।
मग उणीव भरून काढण्यासाठी इंजेक्शन झाले सुरु काढल्यावर प्लास्टर ।।6।।
असा ह्या पडण्याचा अनुभव घेतला मी पाहिल्यांदा ।
मदत केली त्यांचे आभार मानते प्रत्येक वेळेस आठवताना ।।7।।
Comments
Post a Comment