सतत पाहिल्याशिवाय आता चैन पडत नाही ।
आवाज झाला की चटकन मोबाईल पाही ।।1।।
सवय झाली आता नेट बंद तर वाटते हरवल्यासारख ।
जवळ असलेल्या सुखद क्षणांना झालो आपण पारख ।।2।।
पर्सनल चॅट आणि ग्रुप झाले यावर तयार अनेक ।
सोसायटी,फॅमिली,शाळा,कॉलेज नी शहराचा एक ।।3।।
यामुळे आपण राहू लागलो जुण्या नव्या च्या संपर्कात ।
बोलताना ,फोटो बघून भेटल्याचा आनंद होतो जणू प्रत्येक्षात ।।4।।
येणाऱ्या पोस्ट च्या असतात गमती जमती छान ।
कधी कधी हसता हसता हरपून जाते भान ।।5।।
काही असतात जे सतत करतात उपदेशात्मक कॉपी पेस्ट ।
वाचायला कंटाळतात लोक ते कितीही असो मग बेस्ट ।।6।।
दुसऱ्यांना सांगी ब्रम्हज्ञान अश्यांची पण नसते कमी ।
आलेलं सर्व खरचं असल्याची पण नसते हो हमी ।।7।।
कधी काळी जबाबदारी,काळजीवाहू असतात संदेश ।
काही तरी कामगिरी होऊन जाते यामुळे विशेष ।।8।।
चांगलं ते आपलं म्हणून घ्या हवं तेवढं फक्त ।
ह्या आभासी जगाचे होऊ नका भक्त ।।9।।

Comments
Post a Comment