आज गरज आहे चांगल्या विचारांची ।
घाबरून न जाता घरी बसून आलेल्या संधीची ।।1।।
साथ द्या झटत असलेल्या डॉक्टर नि पोलीसांची ।
घराबाहेर न पडून मदत करू त्यांच्या कुटुंबाची ।।2।।
देशासाठी जवान घरापासून दूर काढतात सीमेवर रात।
आपण आपल्याच घरात राहून करूया यावर मात ।।3।।
घरातल्या घरात करायचे तरी काय ।
करायचं राहून गेलेलं खूप काही हाय ।।4।।
रोजची तीच सकाळ बदलून गेली काहीशी ।
योग, प्राणायाम यांची सांगड घाला थोडीशी ।।5।।
सतत नकारात्मक बातमी वाचून वाईट वाटत खूप ।
पण या सर्वांवर आपलं खंर योगदान घरात राहावं चूप ।।6।।
नोकरीमुळे मुलांना देता येत नव्हता वेळ ।
त्यांच्या सोबत लहान होऊन खेळू आपले हरवलेले खेळ ।।7।।
तुम्हीही शिका मुलांकडून काही नवीन ।
करा प्रयत्न होण्याचा कशात तरी प्रवीण ।।8।।
एक सकारात्मक विचार जीवन बदलून देईल ।
जगण्याची एक नवीन उमेद घेऊन येईल ।।9।।

Comments
Post a Comment