शिकवण


अन्न हे पूर्णब्रह्म हे माहित आहे आपल्याला ।
याचे महत्व आजची परिस्थिती सांगते आहे सर्वाला ।।1।।
कांदा, लसूण टाकताना विचार करायला लावतेय टोपली ।
भाजीत रस्सा वाढवला तर सोय होईल आपली ।।2।।
घरगुती भाज्यांचे निवडा पर्याय छान ।
नवीन प्रयोग करून रेसिपी ला द्या मान ।।3।।
डाळ, तांदूळ, कणिक यांचा कमी झाला पुरवठा ।
जपून वापर करावा लागेल नाही तर संपेल जवळचा साठा ।।4।।
कोथिंबीर नसली तरी आता काही फरक पडत नाही ।
काटकसर करायची शिकवण आठवणीत राही ।।5।।
नियोजन करून व्यवस्थित बाहेर जाणे टाळा ।
घरी आल्यावर स्वच्छतेचे सर्व नियम पाळा ।।6।।
दिवसावर पोट असणाऱ्यांचा बिकट आहे प्रश्न ।
म्हणूनच कधीही वाया घालवू नका अन्न ।।7।।

Comments