महाराष्ट्र दिन


1 मे राज्याच्या निर्मिती दिवसाचा आहे  याला मान ।
यांसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना कोटी कोटी  प्रणाम ।।1।।
 महाराष्ट्राला सर्व स्तरातून लाभला वारसा फार मोठा ।
 ऐतिहासिक, सांस्कृतिक नि सामाजिक यांचा नाही तोटा ।।2।।
श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारले हिंदवी स्वराज्य महान ।
त्यांच्या सोबतीला मावळे जमले अनेक मोठे नि लहान ।।3।।
देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द  उभारला होता लढा ।
यांत फडके,गोखले ,टिळक,सावरकर यांनी शिकवला चांगलाच धडा ।।4।।
या संतांच्या भूमीत होऊन गेले  ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, गाडगेबाबा असे अनेक संत श्रेष्ठ ।
फुले, आंबेडकर सोबतच  कर्वे व पाटील यांनी घेतले समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट ।।5।।
अमृतातेंहि पैजा जिंके अशी आपली मराठी  मातृभाषा ।
 जन्म पाऊनि सार्थक झाहलो प्रणाम घ्यावा हे महाराष्ट्र देशा ।।6।।




Comments