मातृदिन

 स्त्री बाळ जन्माला आले कि ती होती आई ।
कधी ती असते लहान भावाबहीणीला सांभाळणारी  ताई ।।1।।
म्हणतात मुलींमध्ये असतो वास्यल्य हा गुण ।
घराला घरपण आणणारी आहे ती सुरेल धुन ।।2।।
मुलांसाठी योग्य काय तिला असते ठाऊक ।
त्यांच्यासाठी  ती नेहमी असते भावूक ।।3।।
शब्दांत मांडणे आहे कठीण एका आईचे प्रेम ।
ती कुठल्याही भूमिकेत गेली तरी ते राहते सेम ।।4।।
अश्या या मातांनो तुम्हांला मातृदिनाच्या अनेक शुभेच्छा ।
तुमचा आशीर्वाद सतत आम्हाला लाभो हीच आहे इच्छा ।।5।।

Comments

  1. स्त्रीची महती सांगणारे सुंदर काव्य

    ReplyDelete

Post a Comment