चांगली सवय

कोरोनाचे संकट टळलं नाही अजून ।
सर्वांना आता राहावं लागेल अधिक जपून ।।1।।
काही म्हणा याने लावली सवय चांगली ।
मला काही होत नाही ही विचारसरणी पांगली ।।2।।
आकाश झाले निरभ्र ,स्वच्छ वाहू लागली नदी ।
प्राणी,पक्षी स्वच्छंद विहरले जे झाले नाही कधी ।।3।।
बाहेरचं खाणारे आवडीने भेळ आणि पाणीपुरी ।
लक्षात आलं का कमी पडतोय ना आजारी ।।4।।
मित्रांना आणले जवळ जे झाले  होते काहीसे दूर ।
एकत्र येण्याने घरा घरात आनंदाचे उमटले सूर ।।5।।
महत्वाचे नसतं काही हे कळून  चुकलंय ।
थोड्यातही आपलं आता चांगलंच भागतंय ।।6।।
वेळेचा सदुपयोग म्हणून सर्व जोपासतंय हरवलेलं छंद ।
राहूनच गेले होते जे मनात कुठे तरी बंद ।।7।।
माणसात असणारा  देव दाखवला याने सर्वांना ।
चांगल्या सवयी अश्याच राहो हीच आहे प्रार्थना ।।8।।

Comments

  1. अगदी बरोबर, कोरोना ने माणसाला त्याची जागा दाखवून दिली. कोरोना बरच काही बदलून आणि शिकवुन जाणार आहे.

    ReplyDelete

Post a Comment