मनातलं वादळ

मन आणि शरीर जश्या नाण्याच्या बाजू  दोन ।
मनात येणारा ताण नाहीसा करणारा असावा जवळ एक फोन ।।1।।
फोन  हवा असा, ऐकून घ्यावे त्याने मनातलं सर्व ।
ज्याने मनात उठलेल्या वादळाचे ,निराशेचे गळून जाईल पर्व ।।2।।
अश्या या फोन सारखं कुणीतरी असावं आयुष्यात ।
ज्याच्यासमोर विना संकोच व्यक्त होता होईल भाष्यात ।।3।।
रडता, हसता नि भांडता ही यावं भरपूर ।
जो ऐकून घेतांना तुमचं कधीच न व्हावा दूर ।।4।।
असे न झाल्यास त्याचे परिणाम दिसतात शरीरावर थेट ।
 बोलून मोकळं व्हा देवाने दिलेलं हे जीवन आहे ग्रेट ।।5।।



Comments