"अन्न हे पूर्णब्रम्ह!!"

 


नमस्कार ,
        
  मी भूमिका आपणा सर्वांच्या आशिर्वाद आणि  प्रोत्साहनामुळे  आज आपल्या  भेटीला
   “Love to Cook and Creativity” घेऊन आली आहे .माझ्या आधीच्या ब्लॉग


प्रमाणेच मला इथही तुमचे प्रेम मिळेल ही आशा करते .

लॉकडाऊनच्या काळात जुने फोटो पाहत असतांना मला काही मी बनवलेल्या पदार्थांचे फोटो मिळाले. फेसबुक वर  असलेल्या माझ्या फूड अल्बम मध्ये मी ते फोटो सहज पोस्ट केले .बघता बघता त्यावर मला त्या पदार्थांच्या रेसिपीची  विचारणा होऊ लागली. तेथे  रेसिपी लिहणे व सांगणे शक्य नसल्यामुळे मला अनेकांकडून ब्लॉग लिहण्याबद्दल प्रोत्साहन मिळाले .  

घरोघरी  रोजच  निरनिराळे पदार्थ बनविले जातात पण प्रत्येक भागात बनणाऱ्या पदार्थाची पद्धत निश्चितच निराळी असते.ऋतु, हवामान, सणावाराला अनुसरून आपण आपल्या घरात पदार्थ बनवतो. 
                   
"अन्न हे पूर्णब्रम्ह!!"

अन्नामुळेच आपल्या शरीराचे पोषण व संवर्धन होते, अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे म्हणूनच ते कधीही वाया घालवू नये. असे म्हणतात “माणूस जसा खातो, तसाच बनतो” कारण आपली वृत्ती, स्वभाव हे आपल्या खाण्यावरही अवलंबून असतो. म्हणूनच आपला आहार नेहमी संतुलित असणे आवश्यक आहे. घरी बनविलेल्या पदार्थामध्ये नेहमीच आपुलकी आणि प्रेम असते. काही पदार्थ पारंपरिक आजी कडून आई कडे व आई कडून पुढील पिढीत जोपासले जातात. आता तर त्यांना नवीन रूपात आणण्याची कला जोपासली जात आहे. पारंपारिक, पौष्टिक पदार्थाची लज्जत काही औरच असते. अश्याच वैविध्यपूर्ण पदार्थांची मेजवानी माझ्या या ब्लॉग वर तुम्हा पर्यंत पोचविण्याचा माझा प्रयत्न राहील.
🙏🙏   धन्यवाद   🙏🙏
           

Comments