उन्हाचा
तडाखा वाढला की आठवण होते थंड पदार्थांची. सध्या युरोप मध्ये मस्त उन्हाळा
सुरु झाला आहे. अशातच आठवतो तो थंडावा देणारा आजीच्या बटव्यातला गुलकंद.
चला तर करूया मुलांनाही आवडेल आणि पौष्टिक असं सोपं आणि थंड थंड गुलकंद
मिल्कशेक.
Simmering summer brings out quench
for chilled drinks in everyone. With summer starting to peak in Europe,
one is reminded of gulkand from grandma's kitchen. So let's make a cool
and refreshing healthy gulkand milkshake which even the children would
enjoy.
साहित्य :
१कप दूध
२ चमचे साखर
१ १/२चमचा गुलकंद
५-६ गुलाब पाकळ्या
२-३ बर्फाचे तुकडे
५ काजू
५ बदाम
Ingredients:
1 cup Milk
1 1/2 spoon gulkand
5-6 rose petals
2-3 ice cubes
5 cashew nuts
5 almonds
1 cup Milk
1 1/2 spoon gulkand
5-6 rose petals
2-3 ice cubes
5 cashew nuts
5 almonds
कृती :
सर्वप्रथम
दूध गरम करून मग fridge मध्ये थंड करून घेणे. मिक्सरच्या भांडयात ४
बदाम, ४ काजू, साखर , ३-४ गुलाब पाकळ्या व १ चमचा गुलकंद टाकून त्यात २-३
चमचे दूध टाकून बारीक पेस्ट करून घेणे. सर्व छान बारीक झाले की त्यात
उरलेले दूध व बर्फ टाकून परत मिक्सर ला फिरवून घेणे. तयार आहे मस्त ,थंडगार
गुलकंद मिल्कशेक. एका ग्लास मध्ये ओतून त्यावर (उरलेले) बदाम व काजूचे
छोटे छोटे तुकडे व गुलकंद टाकावे. गुलाब पाकळ्यांनी सजवून serve करावे.
बघताक्षणी डोळ्यांना तसेच पिल्यावर शरीराला थंडावा देणारे गुलकंद मिल्कशेक
नक्की करून बघा.
Recipe:
Definitely try the Gulkand milkshake which cools the eyes as well as the body after drinking.

Comments
Post a Comment