चहा म्हटलं कि डोळ्यासमोर येतो वाफाळलेला चहाचा कप. त्यात जर 'मसाला चहा'
असेल तर अतिउत्तमच. 'मसाला' चहाला एक उत्कृष्ट चव आणि सुवास देतो आणि मनाची
मरगळ दूर करून स्फूर्ती निर्माण करतो.
थंडीत, तसेच सध्या चालू असलेल्या इन्फेक्शन चा विचार करता, मसाला टाकून चहा
तयार करणे हा एक उत्तम पर्याय आहे.सर्दी, खोकला असतांना हा खवखवणाऱ्या
घशाला नक्कीच आराम देतो.
घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून आपण आज चहाचा मसाला कसा बनवायचा हे पाहू.
साहित्य :-
- ३ ते ४ सुंठ चे मध्यम आकाराचे तुकडे (तयार सुंठ पावडर हि चालेल- २ चमचे )
- १२ ते १५ हिरवी विलायची
- १/४ छोटा चमचा काळे मिरे ( साधारण १० )
- १/२ छोटा चमचा लवंग (साधारण १० ते १२)
- १/४ छोटा चमचा जायफळ पावडर
- २ दालचिनीचे(कलमी) तुकडे
कृती :-
सर्व प्रथम सुंठ व दालचिनी हलकेसे कुटून घ्यावी जेणेकरून
मिक्सर मध्ये बारीक करताना त्रास होणार नाही .
त्यानंतर कढईमध्ये काळे
मिरे,लवंग ,कुटलेली सुंठ व दालचिनी मंद आचेवर १ मिनिट भाजून घ्यावे.
भाजलेले जिन्नस कढईत न ठेवता गार होण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घ्यावे.
मिश्रण गार झाल्यावर मिक्सर च्या भांडयात ओतून त्यात हिरवी विलायची व
जायफळ पावडर टाऊन बारीक करून घ्यावे.
तयार झाला आपला सुगंधी आणि औषधीयुक्त
चहाचा मसाला .
हा मसाला हवाबंद डब्यात भरून ठेवाल्यास ३ ते ४ महिने सहज टिकतो.
* चहा करताना 1 कप चहाला चिमूटभर मसाला वापरावा.
संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Comments
Post a Comment