टोमॅटो चटणी - Tomato Chutney

लाल-लाल टोमॅटो पाहायला सुन्दर आणि खाण्यात स्वादिष्ट तसेच पौष्टिक पण असतात. अश्या ह्या लाल टोमॅटो ची चटणी खूप स्वादिष्ट लागते. चला तर बनवू या टोमॅटो ची दीर्घकाळ टिकणारी झणझणीत चटणी.


साहित्य:
  • ५ कप बारीक कापलेले लाल टोमॅटो 
  • २ काप बारीक कापलेला कांदा
  • १ कप बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या 
  • १/४ काप बारीक चिरलेल्या हिरवी मिरची 
  • ३/४ कप तेल 
  • १  चमचा मोहरी
  • १ चमचा जिरे
  • २ चमचे  लाल तिखट ( आवडीनुसार कमी जास्त करू शकता )
  • २ छोटा चमचे  हळद 
  • १ चमचा धने पावडर 
  • १/४ छोटा चमचा हिंग 
  • २ चमचे  व्हिनेगर 
  • २ चमचा साखर
  • मीठ चवीनुसार 


कृती:

सर्वप्रथम  टोमॅटो, कांदा, मिरची, लसूण पाकळ्या सर्व छान बारीक  चिरून घ्या.
एक भांडे गॅसवर ठेवून गॅस मध्यम आचेवर सुरु करावा व भांड्यात तेल टाकून घ्यावे. 
तेल गरम झाले कि त्यात मोहरी,जिरे टाका. 
मोहरी,जिरे तडतडायला सुरुवात झाली कि त्यात कांदा टाका व तो तेलात छान परतवून घ्या. 
कांदा झाला कि त्यात मिरची व लसूण टाका. 
सर्व छान  सोनेरी रंगावर परतल्यावर त्यात तिखट, हळद,धने पावडर , हिंग व चवीनुसार मीठ टाकून चांगले एकत्र करून घ्या.
मसाला तेलात परतवा. 
आता त्यात टोमॅटो टाका व सर्व एकत्र करून घ्या. 
टोमॅटो झाकण ठेवून शिजू द्या. 
थोड्या थोड्या वेळात परतवत राहा. 
चटणीला सुटलेलं पाणी पूर्ण आटण्यासाठी मधून मधून परतवत रहा. 
चटणी मध्ये पाणी राहता कामा नये. 
पाणी पूर्ण आटले कि आता चटणीत साखर टाकून घ्या. 
चटणी ला आणखी घट्टपणा येईल. 
सर्वात शेवटी व्हिनेगर टाकून चांगले मिक्स करा. 
थोड्या वेळाने तेल सुटायला लागेल. 
टोमॅटो चांगले शिजून एकजीव झाले कि गॅस बंद करा.
पूर्ण थंड झालेले चटणी काचेच्या भरणीत  भरून ठेवा . 

 तयार आहे तुमची आंबट, गोड, तिखट टोमॅटो चटणी. 
चपाती, पराठा , पुरी, दोसा यांच्यासोबत आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता खूप छान  लागते. 
आताच्या परिस्थतीत भाजी ला एक उत्तम पर्याय.

** हिवाळ्यात भरपूर प्रमाणात व चांगले प्रतीचे  टोमॅटो उपलब्ध असतात. यावेळेस हि चटणी बनवून ठेवल्यास छान टिकते. 





Comments