मिनी समोसा - Mini Dry Samosa

 

गरमागरम  आलू समोसा सर्वानाच आवडतो पण टिकणारा कोरडा समोसा शक्यतोवर आपण बाहेरूनच आणतो.
संध्याकाळी चहा सोबत  तसेच  मुलांना अतिशय आवडणारा मिनी समोसा आपण घरच्या घरी बनवू सहज बनवू शकतो. चला तर बघूया  मिनी समोसा.


साहित्य :

  • १ कप मैदा
  • १/४ छोटा चमचा ओवा
  • २ चमचे तेल
  • १ चमचा धने
  • १चमचा सोप
  • १ चमचा तीळ
  • २ चमचा खोबरा किस
  • १/२ कप फरसाण / शेव / मिक्चर शेव ( जे उपलब्ध असेल )
  • १ छोटा चमचा लाल तिखट
  • १ चमचा चिंचेची चटणी
  • १ चमचा साखर 
  • १/२ चमचा आमचूर पावडर
  • ४-५ काजू
  • ८-१० किसमिस
  • मीठ
  • तेल तळण्यासाठी
  • पाणी


कृती :

  • सर्वप्रथम एका भांड्यात मैदा घेऊन त्यात ओवा, चवीनुसार मीठ व दोन चमचे तेल टाकून घ्या.  
  • तयार जिन्नस मुट्ठीत घेतल्यास त्याचा गोळा व्हायला हवा असे एकत्र करून घ्या. 
  • त्यानंतर पाणी घेऊन त्याचा घट्टसर गोळा बनवून घ्या. 
  • आता तयार गोळा झाकून २०-२५ मिनिटे ठेवून द्या.
  • तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया. 
  • एका कढईत मंद आचेवर धने, सोप, तीळ  आणि खोबरा कीस भाजून घ्या. 
  • १५ ते २० मिनिटे मंद आचेवर सोनेरी रंगावर परतवून गॅस बंद करा. 
  • तयार भाजणी थंड होण्यासाठी प्लेट मध्ये काढून ठेवा . 
  • थंड झाली की मिक्सरच्या भांडयात ओतून त्यात शेव, तिखट, आमचूर पावडर, मीठ, साखर टाकून त्यातच चिंचेची चटणी टाकून  मिक्सरला फिरवून घ्या. 
  • तयार मिश्रण एक बाउल मध्ये काढून घ्या. 
  • आता त्यात काजूचे बारीक काप व किसमिस टाकून एकत्र करा.
  • आता सारणासाठीची कणिक  थोडे मळून  घ्या. 
  • त्याचे पुरीला लागतील असे छोटे गोळे बनवून घ्या. 
  • तयार गोळ्याला लाटून पुरीचा आकर द्या. 
  • आता खाली दाखविल्याप्रमाणे मध्ये कापून घ्या व त्याला समोस्याचा आकार देत कडा व्यवस्थित दाबून घ्या . 
  • जेणेकरून तळताना समोसाचे सारण बाहेर येणार नाही.
  •  आता आतमध्ये सारण भरून त्याला आतमध्ये दाबत वरील बाजू चांगली दाबून बंद करून घ्या. 
  • एका साइडला कढईत तेल  गरम करायला ठेवा. 
  • सर्व सामोसे बनवून घ्या. 
  • तेल गरम झाले असल्यास गॅस मध्यम आचेवर  करून त्यात समोसे सोडा. 
  • १ ते २ मिनिटांनी गॅस मंद आचेवर करावा. 
  • आता मंद आचेवर  समोसे तळून घ्या. 
  • छान मंद आचेवर तळल्याने समोसे छान खुसखुशीत होतात. 


अश्याप्रकारे सर्व समोसे तळून घ्या व थंड झाले कि (शिल्लक राहिल्यास 😜) हवाबंद डब्यात भरून ठेवा.   


सपूंर्ण  कृती खालील व्हिडीओ मध्ये तुम्ही बघू शकता. 

👇




Comments

Post a Comment