शाही मोदक - Shahi Modak

गणपतीला दहा दिवसात रोज छान छान खाऊ करून द्यावा असे प्रत्येकाला वाटते. मोदक हा गणपतीचा आवडता खाऊ व घरातही लहानांपासून मोठयापर्यंत सर्वांना आरती नंतर हवाहवासा प्रसाद. चला तर आपल्या ह्या आवडत्या गणपती बाप्पा साठी झटपट होणारा व पौष्टिक असा शाही मोदक बनवूया.

साहित्य:

  • १५ - २० बदाम
  • १०-१२ काजू
  • ३-४ सुके अंजीर 
  • २०-२५ मनुका
  • १०-१२ पिस्ता
  • १/२ कप खोबरा किस
  • १/४ कप गूळ
  • १/४ छोटा चमचा विलायची पूड

कृती:

सर्वप्रथम खोबरा किस, गूळ आणि विलायची पूड एका भांड्यात काढून घ्या व अंजीर चे बारीक काप करून घ्या. काजू, बदाम, पिस्ता, मनुका व अंजीर याना मिक्सरला बारीक करून घ्या. आता बारीक केलेले सर्व साहित्य खोबरा किस मध्ये टाकून एकत्र करा. तयार मिश्रणाला परत एकदा मिक्सरला फिरवून घ्या जेणेकरून गूळ छान मिक्स होईल. 

आता तयार मिश्रणाचे एकसारखे मोदक वळून घ्या. 

तयार आहे आपल्या बाप्पासाठी शाही मोदक.


संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

*मोदक साचा असल्यास छान मोदक वळता येतात पण जर साचा नसेल तर चमच्या च्या साहाय्याने मोदक वळून त्यावर पारीसारखा दाखविल्याप्रमाणे आकार द्यावा.

Comments