केळीचे चिप्स - Banana Chips

 
केरळचे स्पेशल केळीचिप्स सर्वांच्या नेहमीचं आवडीचे. लहान मुलांना तर चिप्स फार आवडतात.
हिरव्या कच्च्या केळी पासून बनवलेले हे चिप्स घरी करणे अगदी सोपे आहे. चला तर बघूया कसे बनवायचे चटपटीत केळीचे चिप्स.
 
साहित्य :
  • २ कच्ची केळी
  • १/४ छोटा चमचा लाल तिखट 
  • १/४ छोटा चमचा जिरे पूड
  • १/२ छोटा चमचा बारीक साखर
  • चिमुटभर चाट मसाला
  • मीठ चवीनुसार
  • तेल तळण्यासाठी
कृती :
  • कच्ची केळी चे साल खूप काढायला कठीण असते त्यामुळे चाकूच्या साहाय्याने काप देऊन ते काढावे.
  • एका साईडला कढईत तेल मध्यम आचेवर गरम करायला ठेवा.
  • साल काढल्यावर केळी लगेच चिप्स करायला घ्यावी, नाहीतर काळी पडते.केळीचे दोन्ही साइडचे टोके काढून घ्यावी.
  • केळीचे काप आपण थेट कढईत करत असल्याने सांभाळून करावे.
  • १-२ मिनिटांनी गॅस मंद आचेवर करावा.
  • काप परतवून द्यावे.
  • ८-१० मिनिटे मंद आचेवर तळल्याने छान क्रिस्पी चिप्स तयार होतील. चिप्स तेलातून काढून घ्या.
  • चिप्स थंड झाले कि एका खोलगट भांड्यात ओतून घ्या.
  • मसाला तयार करून घ्या ( लाल तिखट, जिरे पूड,मीठ, साखर, चाट मसाला)
  • तयार मसाला चिप्स वर सगळीकडे सारखा टाकून चांगले मिक्स करून घ्या.
  • तयार आहेत आपले चटपटीत केळीचे चिप्स.
  • चिप्स हवाबंद डब्यात भरून ठेवावे जेणेकरून ते क्रिस्पी राहतील.

संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.



* मसाला तयार करताना आपल्या आवडीनुसार पदार्थ कमी जास्त करू शकता.
* उपवास स्पेशल करायचे असल्यास लालतिखट ऐवजी मिरे पूड वापरावी.

 


Comments