मका (भुट्टा ) करंजी - Corn Karanji

पावसाळा सुरु झाला कि मका बाजारात विकायला येतो. पावसात भट्टी वर भाजलेला गरम गरम मका (भुट्टा) सगळ्यांनाच आवडतो. आज आपण  घरात आणलेला मक्याला जरा वेगळ रूप देऊन मक्याची करंजी करूया. हो हो करंजी गोड तर आपण नेहमीच बनवतो चला तर बनवूया मक्याची खुसखुशीत तिखट करंजी.

साहित्य :

सारणासाठी :
  • १ कप सोललेले मक्याची दाणे
  • २ चमचे तेल
  • १/२ चमचा जिरे
  • १/२ चमचा सोप
  • १ चमचा बेसन
  • १ छोटा चमचा धने पावडर
  • २ छोटा चमचा लाल तिखट
  • १/२ छोटा चमचा हळद 
  • २ छोटा चमचा आमचूर पावडर 
  • १ छोटा चमचा साखर 
  • चिमूटभर हिंग 
  • मीठ
पातीसाठी :
  • १ कप मैदा
  • २ चमचे तेल
  • १/४ छोटा चमचा ओवा
  • मीठ
  • पाणी
  • तेल तळण्यासाठी

कृती :

 सर्वप्रथम मक्याचे दाणे स्वच्छ करून मिक्सरला जाडसर बारीक करून घ्या. (खूप बारीक केल्यास त्याची पेस्ट होईल ).
  • आता एका भांडयात तेल टाका. 
  • नंतर त्यात जिरे, सोप टाका व ते तडतडायला लागले कि त्यात धने पावडर, बेसन टाका व चांगले तेलात भाजून घ्या. त्यानंतर त्यात तिखट, हळद, आमचूर पावडर, हिंग,  चवीनुसार मीठ टाकून एकत्र करा व त्यात बारीक केलेला मका टाका. 
  • आता सतत परतवत रहा. 
  • मंद आचेवर ८-१० मिनिटांनी सर्व मिश्रण  सुटसुटीत होईल पाणी निघून मका छान मोकळा होईल. 
  • मिश्रण भांड्यात पसरवून थंड होऊ द्या. 
  • थंड झाले कि त्यात साखर टाकून मिक्स करा तयार आहे आपलं करंजीचे सारण .
  • आता पातीसाठी मैद्यामध्ये ओवा, चवीनुसार मीठ, तेल टाकून एकत्र करा. 
  • मुट्ठीत पकडल्यास मिश्रण आकार घेईल. 
  • आता पाणी घेऊन चपतीला लागणाऱ्या कनिकेसारखा गोळा बनवून घ्या. 
  • तयार गोळा १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा.
  • तयार गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून त्याची दाखविल्याप्रमाणे करंजी करून  करून घ्या.
  •  कढईत तेल गरम करून मध्यम ते मंद आचेवर तळून घ्या. 

संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

तयार आहेत तुमच्या खुसखुशीत, गरमागरम मका करंजी. करंजी नुसतं किंवा चिंचेच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

Comments