मऊलुसलुसीत दहीवडे खातांना तोंडात येणारा वेगवेगळ्या चवींचा आस्वाद काही औरच असतो. दहीवडे खायला आवडत नाही असं कोणी नसेलच कदाचित. चला तर असा मऊ दहीवडा कसा बनवायचा ते बघूया.
साहित्य :
- १/२ कप उडीद डाळ
- १ कप दही
- २ हिरवी मिरची
- १०-२० ग्रॅम कोथिंबीर
- २ चमचे पिठी साखर
- १/४ छोटा चमचा लाल तिखट
- १/२ छोटा चमचा जिरे पूड
- १/४ छोटा चमचा चाट मसाला
- २ -३ चमचे चिचेंची चटणी
- २ चमचे डाळींबाचे दाणे (असल्यास)
- बारीक शेव ( असल्यास )
- मीठ चवीनुसार
- तेल तळण्यासाठी
- पाणी
कृती :
- सर्वप्रथम उडीद डाळ स्वच्छ धुऊन ३ ते ४ तास भिजत घाला.
- डाळ मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्या.
- नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून थोडे मिक्स करून घ्या.
- एका साईडला कढईत तेल टाकून माध्यम ते मंद आचेवर गरम करायला ठेवा.
- एका प्लेट मध्ये पाणी घ्या.
- प्लेट मधील पाण्यात हात ओला करा व तयार मिश्रणाला गोल आकार देत तेलात सोडा .
- एका साईडने सोनेरी रंग आल्यावर परतवून घ्या व दोन्ही साइडला सोनेरी रंग आल्यावर वडे बाहेर काढून घ्या .
- तयार तळलेले वडे कोमट पाणी करून त्यात पूर्ण बुडतील अश्याप्रकारे १ तास ठेवा .
- तोपर्यंत हिरवी मिरची व थोड्या कोथींबर ची पेस्ट करून घ्या.
- दह्याला फेटून घ्या व त्यात तयार पेस्ट, पिठी साखर, चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
- वडे हलकेसे दाबून पाण्यातून काढून घ्या.
- वड्यावर आता तयार दही, लाल तिखट, जिरे पूड, चाट मसाला टाकून घ्या .
- वरून त्यावर चिचेंची चटणी, डाळींबाचे दाणे व बारीक कोथिंबीर टाका.
- तयार दहीवड्यावर बारीक शेव ( असल्यास) टाकून सर्व्ह करा.
संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
* ३-४ तास भिजत घालून बारीक केलेल्या डाळीचे वडे लगेच तळल्याने वडे तळातांना तेल कमी प्रमाणात शोषले जाते.
Comments
Post a Comment