फ्रुट कस्टर्ड - Fruit Custard

 
 

लहान मुल फळ खायला नको म्हणणार नाही असा एक पदार्थ म्हणजे फ्रुट कस्टर्ड. काही निवडक फळांना एकत्र आणून थंड थंड खायला देताना आपणही त्याला चाखायाला नक्कीच उत्सुक असतो. चला तर असे सर्वाना आवडणारे  फ्रुट कस्टर्ड कसे करायचे ते बघूया.

साहित्य :

  • २ कप दूध (१/२ लिटर )
  • ४ चमचे साखर 
  • २ चमचे कस्टर्ड पावडर 
  • १/२ कप केळीचे काप 
  • १/२ कप सफरचंदाचे काप 
  • १/२ कप द्राक्षे ( काप किंवा अख्खे )
  • १/४ कप डाळींबाचे दाणे

कृती : 

  • सर्वप्रथम दूध मंद आचेवर तापवून घ्या. 
  • दूध तापलं कि साधारण २ चमचे दूध बाजूला काढून ठेवा. बाकी दूध मंद आचेवर उकळू द्या. 
  • काढून ठेवलेले दूध थंड झाले कि त्यात कस्टर्ड पावडर टाकून चांगले एकत्र करा गाठी होता कामा नये. 
  • तयार मिश्रण उकळत्या दुधात हळूहळू ओता व सतत ढवळत रहा. 
  • १ मिनिटांनी  त्यात साखर टाका व ढवळत रहा.
  • ५ मिनिटांनी मिश्रण घट्ट होईल.त्यानंतर गॅस बंद करा. 
  • मिश्रण थोड्या पसरट भांड्यात ओतून थंड होऊ द्या. 
  • फळ कापून घ्या. 
  • तयार मिश्रण पूर्ण थंड झाले कि अजून घट्ट होईल. आता त्यात फळ टाकून एकत्र करा व फ्रिज मध्ये १ तास थंड होण्यासाठी ठेवून द्या.
  • तयार थंड थंड फ्रुट कस्टर्ड सर्व्ह करा.
संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.



**     १)मी येथे वॅनिला फ्लेवर कस्टर्ड पावडर वापरलं आहे.  

         २)खूप आधी फळ कापून ठेऊ नये कापल्यास फळ काळी पडतात. (उदा. केळी, सफरचंद ) 

 

 

 

Comments