दिवाळीची चाहूल लागताच डोळ्यासमोर उभी राहते पदार्थांची भलीमोठी यादी. चला तर या दिवाळीसाठी फराळाची सुरुवात करूया पारंपारिक अश्या पाकातले लाडू नी. आज आपण बघूया रवा व बेसनाचे पाकातले लाडू.
साहित्य :
- १ कप रवा
- १ कप बेसन
- १/२ कप तूप
- ११/२ कप साखर
- १ कप पाणी
- १२-१५ मनुका
- ५-६ बदामाचे बारीक काप
- १/२ छोटा चमचा विलायची पावडर
कृती :
सर्वप्रथम भांड गॅसवर ठेवून गॅस मंद आचेवर करून सुरु करावा.
भांड्यात ३ चमचे तूप टाकावे व त्यात रवा टाकून मंद ते माध्यम आचेवर छान भाजून घ्यावे.
रवा भाजून त्याला सोनेरी रंग आला कि त्याला एक वेगळ्या भांड्यात काढून घ्या.
गॅस वरील भांड्यात उरलेले तूप टाकून त्यात बेसन टाकावे.
बेसन मंद ते माध्यम आचेवर छान भाजून घ्यावे.
हळू हळू बेसनाला तूप सुटू लागेल.
आता त्यात बदाम व मनुका टाकून तेही भाजून घ्यावे.
आता गॅस बंद करून त्यात भाजलेला रवा टाकून दोन्ही एकत्र करून साईडला ठेवून द्यावे.
पाकासाठी एका भांड्यात साखर व पाणी टाकून गॅस मंद आचेवर सुरु करावा.
साखर खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे सतत ढवळत राहावे.
पाकला मळकट पण वाटत असल्यास त्यात १-२ छोटा चमचा दूध टाकावे .
दुधामुळे पाकातील मळ वर येतो व ते काढणे सहज शक्य होते.
पाक स्वच्छ वाटत असल्यास दूध टाकायची आवश्यकता नाही.
पाकला हळू हळू घट्ट पण येईल .
आता एक तरी पाक तयार होईल. तयार पाकला जास्त घट्ट होऊ न देता गॅस बंद करावा.
पाक तयार मिश्रणात ओतून चांगले मिक्स करावे.
मिश्रणात विलायची पूड टाकून एकत्र करा. मिश्रण तहान होऊ द्या.
रवा बेसन पाकात छान फुलून येईल.
मिश्रण थोडे कोमट असताना लाडू वळून घ्यावे.
पाकात छान मुरल्यामुळे लाडू मऊसर होतात.
असे हे पाकातले लाडू नक्की करून बघा.
संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Comments
Post a Comment