उपवासाला काही गोड खायचा असेल आणि डोळ्यासमोर दिसायला अगदी सहज पण तेव्हडीच किचकट , वरून क्रिस्पी आणि आतून पाकात नाहून निघालेली गोल गोल जलेबी तर काय करायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल , तर त्याच जिलेबीला मी नवीन रूप घेऊन मी आज आली आहे. चला तर आपल्याला उपवासाला चालेल अशी खास उपवासाची जलेबी कशी बनवायची ते आपण बघूया.
साहित्य :
१ माध्यम आकाराचा बटाटा
१/२ कप उपवासाचे पीठ
२ चमचे दही
१/४ छोटा चमचा विलायची पूड
३/४ कप साखर
१ कप पाणी
तेल / तूप तळण्यासाठी
सजावटीसाठी : ( ऑपशनल )
२-३ बदाम
२-३ पिस्ता
कृती :
सर्वप्रथम मध्यम आकाराचं बटाटा उकडवून घ्या.
बटाटा पूण थंड झाला कि साल काढून घ्या.
आता मिक्सरच्या भांड्यात बटाट्याचे काप करून त्यात दही टाकून छान बारीक करून घ्या.
तयार पेस्ट मध्ये थोडे थोडे करत उपवासाचे पीठ टाकत चांगले मिक्स करा.
तयार मिश्रण २५-३० मिनिटे झाकून ठेवा.
पाकासाठी गॅस मंद आचेवर सुरु करून एका भांड्यात साखर व पाणी टाकून घ्या.
साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत राहा.
गॅस मध्यम ते मंद आचेवर करत पाक छान घट्ट होऊ द्या.
पाकला एक तार यायला लागला कि त्यात विलायची पूड टाका व गॅस बंद करा .
जलेबी मध्ये जाण्यासाठी पाक जास्त घट्ट नको.
३० मिनिटांनी मिश्रणाला इकच दिशेने फिरवत २-३ मिनिटे फेटून घ्या.
फेटल्यामुळे मिश्रण छान हलकं होईल.
गॅस वर मध्यम आचेवर करून त्यात तेल / तूप तुमच्या आवडीनुसार गरम करायला ठेवा.
एका प्लास्टिक च्या पिशवीला कोन च आकार देऊन त्यात तयार मिश्रण ओतून घ्या.
गरम तेलात जिलेबीचा आकार देत मंद आचेवर तळून घ्या.
मंद आचेवर तळल्याने जलेबी कुरकुरीत होते.
तळलेली जलेबी ५ मिनीटांनी तेल पूर्ण निथळलेकी पाकात टाका.
पाकात १०-१५ मिनटे दोन्ही साईडनी छान परतवून घ्या.
पाकातून काढून जलेबी एका प्लेट मध्ये काढून जास्तीचा पाक निथळू द्यावा.
तयार जिलेबीवर बदाम व पिस्ता चे काप टाकून सर्व्ह करा.
संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Comments
Post a Comment