दिवाळी २०२० - Diwali 2020

दिवाळी २०२०


दिवाळी सण आहे आनंद आणि उत्साहाचा ।

घरोघरी साजरा केला जातो दिवा लावून सौख्याचा ।।१।।

वर्षातील आहे हा सर्वांत मोठा सण ।

पण यावर्षी लागले याला कोरोनाचे ग्रहण ।।२।।

बाजारात दिवाळीची मजा असायची  वेगळी ।

यासर्वांला  जणू  नजर लागली सगळी ।।३।।

ना खरेदीची मजा ना बाहेरची मिठाई ।

बाहेरून आले कि नुसतं हात धुवायची घाई ।।४।।

घरात आणलेले सामानही करावं लागते क्वारंटाइन ।

जगभर सर्वांनी या संक्रमणाचा खूप भरला आहे फाईन ।।५।।

अशी हि दिवाळी नेहमी लक्षात राही  ।

यावर्षी तर आप्तेष्टांना भेटणेही शक्य झाले नाही ।। ६।।

अंधारात एक दिवाही अंधकार करतो दूर ।

जपण्यासाठी सर्वांना लक्षात ठेवा न व्हावा फटाक्यांचा धूर ।।७।।

समाजासाठी काही आखलेले नियम पाळा ।

उजळून निघावी सृष्टी लावून दिव्याच्या माळा ।।८।।

पूर्वी सारखेच सुरळीत व्हावे सगळे ।

या पेक्षा देवाकडे काय मागावे वेगळे ।।९।।

सर्वांचे जीवन प्रकाशाने मंगलमय होऊ दे हि इच्छा ।

नव्या उमेदासह यावी नवी आशा याच दिवाळीच्या शुभेच्छा ।।१०।।







Comments