पौष्टिक अहळीव लाडू - Healthy Aliv Ladoo


 

थंडीची चाहूल लागताच शरीराला आवश्यकता असते उष्ण व पौष्टिक पदार्थांची .  त्यात सुकामेव्याचा वापर आवर्जून  केला जातो. 
परंतु  ' मूर्ती लहान पण  कीर्ती महान ' असा एक पदार्थ तो म्हणजे अहळीव . या छोट्याश्या अहळीव मध्ये लोह (Iron),फॉलिक ऍसिड , व्हिटॅमिन्स A  आणि E  भरपूर प्रमाणात आहे. यालाच Immunity  Booster असेही  म्हटल्या  जाते . चला  बघूया अहळीव पासून बनणारा एक सोपा प्रकार अहळीव चे  लाडू .  

 साहित्य :-

  • १ कप कोमट दूध 
  • १/२ कप अहळीव ( साधारण १००  ग्रॅम )
  • १ कप खोबऱ्याचा कीस 
  • १ कप किसलेला गूळ 
  • २ चमचे तूप 
  • २ चमचे किसमिस 
  • १५ बदामाचे काप 
  • १५ काजूचे काप 
  • १/४ छोटा  चमचा जायफळ पावडर 
  • १/२ छोटा चमचा विलायची पावडर 
कृती  :-

सर्वप्रथम अहळीव ४ तासासाठी दुधात मिक्स करून  भिजत ठेवून द्यावे. 
४ तासानंतर अहळीव छान भिजले कि त्याला चमच्याने काढून घ्या. 
आता एक भांड गॅस वर ठेवून गॅस मंद आचेवर सुरु करा. 
त्यात आता तूप टाकून घ्या. 
तूप गरम झाले कि त्यात भिजवलेले अहळीव टाकून ५ -६ मिनिटे परतवून घ्या. 
नंतर त्यात खोबऱ्याचा किस टाकून सोनेरी रंग येईस्तोर परतवून घ्या. 
आता त्यात  गूळ टाकून चांगले मिक्स करा. 
हळूहळू गूळ विरघळेल  व पाक होऊन घट्टपणा येऊ लागेल. 
आता त्यात सर्व सुकामेवा टाकून घ्या. 
नंतर त्यात जायफळ पावडर आणि विलायची पावडर टाकून चांगले मिक्स करा. 
सर्व  एकत्र येऊन त्याला घट्टपणा येऊन मिश्रण भांड सोडू लागेल. 
आता गॅस बंद करून  भांड गॅस च्या खाली काढून थोडे थंड होऊ द्या. 
कोमट असताना लाडू वळायला घ्यावे. 
तुमच्या आवडीनुसार लहान व मोठ्या लाडू वळून घ्यावे. 

तयार आहेत आपले पौष्टिक अहळीव चे  लाडू. 


 
**तयार अहळीव लाडू हवाबंद डब्यात भरून  ठेवावे . 
- सामान्य तापमानात ८ -१० दिवस व फ्रीज मध्ये ठेवल्यास १० -१५ दिवस टिकतात. 


संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.



 

Comments