खुसखुशीत आणि खमंग खारे शंकळपाळे - Khare Jeera Shankarpali


मधल्या वेळेस खायला खुसखुशीत आणि खमंग असे खारे शंकळपाळे खूप छान लागतात. लहान मुलेही हि  शंकळपाळे खूप आवडीने खातात. दिवाळी फराळात तसेच इतर वेळेस हि शंकळपाळे घरात नेहमी होतात .चला तर बघूया कसे करायचे खारे शंकळपाळे. 

साहित्य :-

१ कप मैदा 
१/४ छोटा चमचा जिरे 
१/४ छोटा चमचा ओवा 
१/२ छोटा चमचा लाल तिखट 
१/४ छोटा चमचा हळद 
२ चमचा तेल 
चिमूठभर हिंग 
मीठ चवीनुसार 
पाणी 
तळण्यासाठी तेल 

कृती :-

सर्वप्रथम सर्व कोरडे जिन्नस एकत्र करून घ्या. 
ओवा व जिरे टाकताना हातावर चोळून टाकावे ज्यामुळे त्याचा आस्वाद आणखी वाढतो. 
नंतर त्यात तेल टेकवून चांगले मिक्स करावे. 
मुट्टीत धरल्यास त्याचा गोळा  बनतो. 
नंतर पाणी  टाकून घट्टसर गोळा भिजवून घ्यावे. 
तयार गोळा १/२ तासासाठी झाकून ठेवून द्यावा. 
मैदा छान मुरला कि त्याला थोडे मळून घ्यावे व त्याचे  छोटे छोटे गोळे करून घ्यावे. 
आता १ गोळा घेऊन त्याला चपाती सारखे लाटून घ्यावे. 
तयार लाटलेल्या चपातीला आवडीनुसार लहान मोठ्या आकारात काप  द्यावे . 
शंकरपाळी तळण्यासाठी गॅसवर   तेल मध्यम आचेवर  करण्यासाठी ठेवावे. 
तेल छान गरम झाले कि मध्यम ते मंद आचेवर शंकरपाळी तळून घ्यावे. 


मंद आचेवर तळल्यामुळे  शंकरपाळी छान खुसखुशीत होतात. 
अश्याचप्रकारे सर्व शंकरपाळे तळून घ्यावे. 


संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.









Comments