बघता बघता वर्ष संपायला आलं ।
कसं जगायचं हे वर्ष चांगलच शिकवून गेलं ।।१।।
वर्ष म्हणजे ३६५ दिवसाचा पुस्तकचं जणू ।
कोऱ्या पानांवर मांडला असतो वर्षभराचा मेनू ।।२।।
वर्ष २०२० नेहमी राहील लक्षात ।
माणसातील देव दाखविला याने साक्षात ।।३।।
दुःखाला मागे सारून उठवत याने घडवलं ।
थोडं थांबून शांतपणे जगायचं कसं शिकवलं ।।४।।
वाईटातून नेहमी चांगलं होईल हि धरूया आस ।
म्हणूनच अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सूर्य आहे खास ।।५।।
चला तर नवीन येणाऱ्या वर्षाचे करूया स्वागत ।
सर्वांसाठी सुख, समाधान, आनंद देवाकडे मागत ।।६।।
नवीन वर्षात सर्वांच्या पूर्ण होऊ दे सर्व इच्छा ।
याच माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा ।।७।।
Comments
Post a Comment