पौष्टिक सुकामेवा लाडू - Healthy Dates Dry Fruit Laddu

थंडीच्या दिवसात आपण  सुकामेव्याचे  लाडू आवर्जून करतो . साखर व गूळ  न वापरता अधिक पौष्टिक आणि खूप एनर्जी असलेले सुकामेव्याचे  लाडू  कसे करायचे  आपण बघूया. 


साहित्य :-

  • १/२ कप बदाम 
  • १/२ कप काजू 
  • १/२ कप  अक्रोड 
  • १/२ कप खोबऱ्याचा कीस 
  • १/२ कप किसमिस 
  • १/४ कप पिस्ता 
  • ३०० ग्रॅम खजूर 
  • १ चमचा खसखस 
  • २ चमचे तूप 
  • १ छोटा चमचा विलायची  पावडर
  • १ /२ छोटा चमचा जायफळ पावडर 

कृती :-

सर्वप्रथम बदाम , काजू , अक्रोड , पिस्ता  मिक्सर ला जाडसर बारीक करून  घ्यावे. 
खजूर च्या बिया काढून त्याचे बारीक काप  करून घ्यावे . 
भांडे गॅसवर  ठेवून गॅस मंद आचेवर  सुरु करावा. 
त्यात खसखस टाकून छान २-३ मिनिटे भाजून घ्यावे. 
खसखस भाजून झाले कि ते  प्लेट मध्ये काढून घ्यावे. 
भांड्यात १ चमचा तूप टाकून  त्यात बारीक केलेले बदाम , काजू , अक्रोड , पिस्ता  टाकून ५-६ मिनिटे  
मंद आचेवर  छान भाजून घ्यावे. 
मंद आचेवर भाजल्याने त्यातील  ओलसरपणा  निघून लाडू टिकण्यास मदत  होते. 
त्यातच खोबऱ्याचा कीस टाकून ते हि सोनेरी रंग येईस्तोवर भाजून घ्यावे . 
नंतर त्यात किसमिस टाकून तेहि भाजून घ्यावे. 
मंद  आचेवर  भाजल्यामुळे सुकामेव्याला खुसखुशीत पणा येतो. 
हे  मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावे. 
नंतर भांड्यात उरलेले १ चमचा तूप टाकून त्यात खजूर टाकून परतवून घ्यावे. 
खजूर हळूहळू मऊ पडेल त्याला चमचाच्या साहाय्याने प्रेस करून घ्यावे. 
त्याचा  गोळा बनेल. 
त्यात खसखस टाकून मिक्स करावे. 
नंतर  त्यात  भाजलेले सर्व जिन्नस टाकून चांगले मिक्स करावे. 
शेवटी त्यात विलायची  पावडर व जायफळ पावडर  टाकून चांगले मिक्स करावे.
गॅस बंद करून  मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे. 
मिश्रण  कोमट असतानाच लाडू वळायला घ्यावे. 
तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकारात लाडू वळून घ्यावे व हवाबंद  डब्यात भरून ठेवावे . 
तयार  आहेत साखर व गूळ  न वापरता  पौष्टिक सुकामेव्याचे  लाडू. 

संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.









Comments