आयुष्यात म्हणे असतात काही नियम ।
ते मनातल्या कागदावर टिपून ठेवा कायम ।।1।।
सुखा नंतर दुःख आणि दुःखानंतर सुख ।
दोन्हीही उपभोगताना व्हा अंतर्मुख ।।2।।
उन्हानंतर सावलीची मज्याच काही न्यारी ।
ह्या सावलीच्या शोधात फिरते दुनिया सारी ।।3।।
लहानपणी सर्वांना व्हायचे असते पटकन मोठं ।
कुणाला ठाऊक असतं हरवेल आता मोठ्यातल छोटं ।।4।।
तुम्हाला खाली खेचायला इथे तयार असतात धुरंदर ।
म्हणूनच जगून घ्या आनंदाने आयुष्य आहे सुंदर ।। 5।।
Comments
Post a Comment