श्रावण महीना म्हटलं कि सणांची सुरुवात. लागणारी मिठाई सहसा बाहेरून आणली जाते परंतु घरी जर आपण ती बनवू शकलो तर किती छान. चला तर प्रत्येक आनंदाच्या क्षणाला आवर्जून लागणार पेढा कसा बनवायचा ते आज आपण बघूया.
Month of shravan means start of festival season. Generally sweets are bought during festivals; however how good it would be if we can make these at home. So let's see how we can prepare pedha which is a must to celebrate every happy occasion.
- १ कप दूध
- १/२ कप दूध पावडर
- १/४ कप पिठीसाखर
- २ छोटे चमचे साजूक तूप
- १/४ छोटा चमचा विलायची पूड
- चारोळी / पिस्ता ( आवडीनुसार सजावटीसाठी )
- 1 cup milk
- 1/2 cup milk powder
- 1/4 cup powdered sugar
- 2 teaspoon pure Ghee
- 1/4 teaspoon cardamom powder
- Charoli( Chiroli/ chirolo/Buchanania lanzan nuts) / Pistachio (for decoration as per your liking)
कृती :
सर्वप्रथम दूध चांगले गरम करून उकळू द्या. दूध अर्धे झाले कि त्यात दूध पावडर हळूहळू टाकत मिक्स करा.
गॅस मंद आचेवर ठेवून सतत ढवळत रहा व थोडा घट्टपणा आला कि त्यात साखर टाका.
मिश्रण घट्ट होऊ लागेल तेव्हा त्यात विलायची पूड टाका. मिश्रणाचा गोळा तयार होऊ लागला कि तूप टाकून त्याला एकत्र करा.हळूहळू मिश्रण भांड सोडायला लागेल त्यावेळेस गॅस बंद करा .तयार गोळा एका दुसऱ्या प्लेट मध्ये काढा.कोमट असतानाच मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून पेढे वळून घ्या.
पेढ्यावर आवडीनुसार चारोळी / पिस्ता लावून सजवून घ्या. तयार आहे स्वादिष्ट पेढा.
* प्रमाण - दूध च्या १/२ दूध पावडर आणि दूध पावडर च्या १/२ साखर
१ कप दूध ला २ छोटे चमचे साजूक तूप Recipe:
* Proportion - Milk Powder 1/2 of Milk and Sugar 1/2 of Milk Powder
For 1 Cup Milk 2 teaspoon ghee
😋
ReplyDeleteThank you☺
DeleteChan
ReplyDeleteThank you😊
Delete