पंढरीची वारी


विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई ।
तू साऱ्या जगाचा झाला आई ।।1।।
निघाली पालखी संतांची आज दिनी ।
आनंद झाला सोहळा पाहुनी लोचनी ।।2।।
वारीत जातो वारकरी विठ्ठलाच्या भेटीला ।
असतो म्हणतात विठ्ठल प्रत्येकाच्या साथीला ।।3।।
तहान ,भूक विसरून वारकरी होतो दंग ।
सगळ्या वारकऱ्यांचा वारीत असतो एकच रंग ।।4।।
ना कुणी लहान ना कुणी मोठा असतो या वारीत 
निघतो  प्रत्येजण सर्व मोहपाश बाजूला सारीत ।।5।।
विठ्ठलाच्या भेटीची सर्वांना एकच असते आस  
त्यामुळेच ऊन,पाऊस याचा तेव्हा कुठलाच होत नाही त्रास  ।।6।।
एकादशी ला घेऊन पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन ।
आम्हा सर्वांचा नमस्कार त्याच्या चरणी करा अर्पण ।।7।।

Comments

  1. पांडुरंग पांडुरंग......👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. पंढरीनाथ महाराज की जय 🙏

      Delete

Post a Comment