विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई ।
तू साऱ्या जगाचा झाला आई ।।1।।
निघाली पालखी संतांची आज दिनी ।
आनंद झाला सोहळा पाहुनी लोचनी ।।2।।
वारीत जातो वारकरी विठ्ठलाच्या भेटीला ।
असतो म्हणतात विठ्ठल प्रत्येकाच्या साथीला ।।3।।
तहान ,भूक विसरून वारकरी होतो दंग ।
सगळ्या वारकऱ्यांचा वारीत असतो एकच रंग ।।4।।
आनंद झाला सोहळा पाहुनी लोचनी ।।2।।
वारीत जातो वारकरी विठ्ठलाच्या भेटीला ।
असतो म्हणतात विठ्ठल प्रत्येकाच्या साथीला ।।3।।
तहान ,भूक विसरून वारकरी होतो दंग ।
सगळ्या वारकऱ्यांचा वारीत असतो एकच रंग ।।4।।
ना कुणी लहान ना कुणी मोठा असतो या वारीत ।
निघतो प्रत्येजण सर्व मोहपाश बाजूला सारीत ।।5।।
विठ्ठलाच्या भेटीची सर्वांना एकच असते आस ।
त्यामुळेच ऊन,पाऊस याचा तेव्हा कुठलाच होत नाही त्रास ।।6।।
एकादशी ला घेऊन पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन ।
आम्हा सर्वांचा नमस्कार त्याच्या चरणी करा अर्पण ।।7।।
एकादशी ला घेऊन पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन ।
आम्हा सर्वांचा नमस्कार त्याच्या चरणी करा अर्पण ।।7।।
पांडुरंग पांडुरंग......👌👌👌👌
ReplyDeleteपंढरीनाथ महाराज की जय 🙏
Delete