आजचा दिवस आहे काही तरी खास ।
देशात सर्वांनी सोडला एक दिर्घ सुखद श्वास ।।1।।
आम्ही कमी नाही हे आज दाखवून दिले काय ।
पोरांना त्रास झाला तर पेटून उठते माय ।।2।।
बदला नाही म्हणायच हि तर एक आहे चेतावनी ।
भारत माता आमची सदैव राहील जगाची राणी ।।3।।
वायुसेनेने आज दहशतवादावर हमला केला थेट ।
पुलवामा शहिदांना दिली सुंदर अशी भेट ।।4।।
26 /2 आता ठेवील जग आता लक्षात ।
एकत्र येऊन लढा द्या खेळ खेळू नका पक्षात ।।5।।
Comments

जय हिंद ....जय भारत
ReplyDelete🙌🙏
ReplyDelete